Swarabhishek

नमस्कार नाट्यरसिकहो,
          लॉस अँजेल्सकरांच्या नाट्यप्रेमाला ओळखून महाराष्ट्र मंडळ आपण साठी घेऊन आले आहे, एक धमाल विनोदी नाटक ‘९ कोटी ५७ लाख

         गाजलेले अभिनेते  संजय मोने यांनी लिहिलेल्या  आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक विजय केंकरे यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकातला विनोद हा विचित्र हावभाव किंवा दुहेरी अर्थ यावर आधारित फुटकळ विनोद नसून  कथानक आणि अभिनय यावर आधारित दर्जेदार विनोद आहे.

        आम्ही सर्व भरपूर उत्साहाने तयारी करतोय आणि तुम्ही तशीच त्याची दाद देताय: त्या बद्दल मंडळ आभारी आहे.  तर लवकरात लवकर आपले तिकीट आरक्षित करा आणि  २४ जून २०१८ ह्या दिवसाची नोंद  तुमच्या कॅलेंडर वर ९ कोटी ५७ लाख नाटकासाठी नक्की करून ठेवा.

        ह्या नाटकात आनंद इंगळे, राजन भिसे, सुलेखा तळवलकर, मंगेश साळवी, विवेक गोरे, राहुल कुलकर्णी आणि रेणुका बोधनकर ह्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहे.

धन्यवाद
महाराष्ट्र मंडळ कार्यकारिणी समिती