Pula

नमस्कार नाट्यरसिकहो,

           महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासामधील एक अजरामर काळ ज्यांनी समृद्ध केला ते महाराष्ट्राचे ‘पुलदैवत’ पु. ल. देशपांडे ! त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या बहुरूपी व्यक्तिमत्वाला आदरांजली वाहण्यासाठी लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळ आणि अभिव्यक्ती समूह संयुक्त विद्यमाने सादर करत आहेत एक मनोरंजक कार्यक्रम !

       पुलंनी गायन, वादन, नाटक, एकपात्री प्रयोग, चित्रपट दिग्दर्शन, संगीत संयोजन, अभिनय, संवाद लेखन, कथाकथन, बालनाट्य, लेखन अशा अनेक क्षेत्रात मनसोक्त संचार केला आणि प्रत्येक क्षेत्रात त्यांनी त्यांचा ठसा उमटवला.  ह्या कार्यक्रमात त्यांच्या ह्या कलाविश्वातील सर्वस्पर्शी सफरीची झलक दाखवण्याचा आमचा नम्र प्रयत्न आहे.  पुलंच्या विनोदाने आपल्याला हसवले आणि हसताहसता अंतर्मुख केले, आपले सामाजिक भान जागृत केले. सुमारे तीन तासाच्या ह्या कार्यक्रमात त्यांच्या सामाजिक पैलूंनाही स्पर्श करण्यात येईल. त्यांच्या चिरतरुण कोट्या, सदैव हसवणारी ‘व्यक्ती आणि वल्ली’ मधली पात्रे, पुलंच्या नाटकातील काही संवाद सादर करण्याचा मानस आहे.  पुलंच्या काहीश्या अपरिचित पैलुचीही ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ओळख होईल असा आमचा प्रयत्न आहे. 
.
      आम्ही सर्व भरपूर उत्साहाने तयारी करतोय आणि तुम्ही तशीच त्याची दाद देताय: त्या बद्दल मंडळ आभारी आहे.  तर लवकरात लवकर आपले तिकीट आरक्षित करा आणि  २७ एप्रिल २०१९ ह्या दिवसाची नोंद  तुमच्या कॅलेंडर वर पु. ल. – एक आठवण’ ह्या वल्लीसाठी नक्की करून ठेवा.

धन्यवाद
महाराष्ट्र मंडळ कार्यकारिणी समिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *